कोविड-१९ अंतर्गत कोथळे खून खटल्यातील संशयितांचा जामीनअर्ज सांगली कोर्टाने फेटाळला

Sangli court rejects bail plea of Kothale murder suspects under Covid-19

सांगली : कोविड-१९ अंतर्गत सर्व न्यायालयाना प्राप्त झालेल्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार सांगली येथील अनिकेत कोथळे खून खटल्यातील संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, रोहित शिंगटे, नसिरुद्दीन मुल्ला, झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असलेल्या अनिकेत कोथळे याचा खून केल्याप्रकरणी संबंधित संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत . त्यांच्या जामीन अर्जावर सीआयडी चे पोलीस उपअधीक्षक आणि या प्रकरणातील तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने संशयितांना जामीन मिळू शकला नाही.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ अंतर्गत जेल मधील आरोपी व संशयितांना तात्पुरत्या स्वरूपात पॅरोल किंवा जामीन वर सोडण्यासाठी याबाबत नियमावली तयार करण्यासाठी अंतर्गत एका उच्चस्तरीय कमिटीची स्थापना करण्यात आली आहे . त्यांच्या बैठकीतील निर्णयानुसार जेल मधील शिक्षा लागलेले आरोपी तसेच चालू असलेल्या खटल्यातील संशयित आरोपींना तात्पुरत्या स्वरूपात पेरॉल किंवा जामीन देण्या संदर्भात नुकतीच काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार जेल विभागाकडून पॅरोल किंवा जमिनाबाबत अर्ज आलेल्या संबंधित जेल मध्ये असलेल्या आरोपींची नावे लीगल एड मार्फत कोर्टात दाखल करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.

त्यात आरोपी किंवा संशयितांचे गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याची तीव्रता तसेच इतर सर्व भौगोलिक वातावरणाचा विचार करून सद्य परिस्थितीत कुणाकुणाला जामीन द्यायचा किंवा कुणाला पॅरोल वर सोडायचे याबाबत अर्ज आल्यानंतर जेल विभागाकडून लीगल एड मार्फत अर्ज संबंधित जिल्हा न्यायालयात हजर करून त्यावर आदेश होतात.

त्यानुसार सांगली येथे गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणातील सर्व संशयितांनी जेल विभागाकडे आपले अर्ज सादर केले होते. मात्र या अर्जावर सीआयडी विभागामार्फत उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी संशयितांना जामीन देण्याबाबत जोरदार आक्षेप घेतल्याने, तसेच गुन्ह्याची तीव्रता आणि एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेऊन कोथळे खून प्रकरणातील सर्व संशयितांची जमीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER