मिरज येथील रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांना कोरोना

Corona positive

सांगली : मिरज (Miraj) येथील शासकीय कोरोना रुग्णालयातील (Corona Hospital) 50 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी 716 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आल्या. जिल्ह्यातील 24 व परजिल्ह्यातील 4, अशा एकूण 28 व्यक्तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील 632 व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत.

ही बातमी पण वाचा:- आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटलांसह बंधुला कोरोनाची लागण

कोरोनामुळे सांगली महापालिकेच्या (Sangli Municipal Corporation) क्रीडा अधिकारी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वैद्यकीय यंत्रणेतील कोरोना योद्धेच बाधित होत असल्याने जिल्ह्यातील उपचार यंत्रणेवर विपरित परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतरीत करण्यात आले होते. सुरुवातीस सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील संशयित रुग्णांची तपासणी येथे करण्यात येत होती.

सध्या मिरजमध्ये फक्त सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. या कोविड रुग्णालयात सुमारे दोनशे परिचारिका, 80 डॉक्टर, 100 चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पदव्युत्तर महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थी कोरोनाबाधितांवर उपचार करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER