दिल्लीतील सोने तस्करीचे सांगली कनेक्शन

Gold Smuggling

सांगली :  दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील (Delhi) रेल्वेस्थानकावरून आठ जणांकडून ४५ कोटी रुपयांची ८४ किलो वजनाची ५०० सोन्याची बिस्किटे डीआरआयने जप्त केली होती.

त्या आठ जणांना अटक करण्यात आली. हे आठही जण सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सीमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने सांगलीत छापे टाकले.

यावेळी संशयितांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयितांनी  म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून सोन्याची तस्करी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित नेहमीच या मार्गाने सोन्याची तस्करी करत असावेत असा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. सांगलीत संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची  माहिती पथकाच्या हाती लागली आहे. शिवाय त्या आठ  संशयितांच्या मागे असणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. यातून सोने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER