शिवसेनेचा भाजपला धक्का, सांगलीतील भाजप नेत्यांनी बांधले शिवबंधन

Sangli-BJP-Leaders-Join-Shivsena

मुंबई/सांगली : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने (Shivsena) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सांगलीत शिवसेनेने भाजपमध्ये खिंडार पाडले आहे. भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

कोणाकोणाचे पक्षप्रवेश?

भाजपचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कवठे एकंद गावचे जयवंत माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ही बातमी पण वाचा : भाजपला मोठी गळती ; अनेक आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER