सांगली : ग्रामपंचायत 1 हजार 298 जागांसाठी 3 हजार 76 उमेदवार मैदानात

सांगली : जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 508 पैकी 207 जागा एकच अर्ज राहिल्याने बिनविरोध घोषित करण्यात आल्या. उर्वरित 1 हजार 298 जागांसाठी 3 हजार 76 उमेदवार मैदानात आहेत. अनेक ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यात सात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत तहसीलदार कार्यालयात चिन्ह वाटपाचे काम पूर्ण झाले.

तासगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 39 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यातील नरसेवाडी, लोकरेवाडी, कौलगे या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील 71 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता 320 जागांसाठी 798 उमेदवार रिंगणात आहेत.

मिरज तालुक्यात 22 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. निवडणूक रिंगणात 241 जागांसाठी 556 उमेदवार नशीब अजमावत आहेत. नऊ ग्रामपंचायतीमधील 34 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 3 जागा रिक्त राहिल्या आहेत. खानापूर तालुक्यातील 13 पैकी तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. इतर 11 गावांत 86 जागांसाठी 231 उमेदवार रिंगणात आहेत. पारे गावात 11 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 108 पैकी एकूण 22 जागा बिनविरोध झालेल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER