ओबीसींसाठी संघर्ष समितीचे ‘ढोल बजाव’ आंदोलन

Dhol Bajao movement

ठाणे :- ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करा, या मागणी साठी ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे नेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ठाणे तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन केले.

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी व अन्य सामाजिक संघटनांनी ‘ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन’ सुरू केले आहे. त्याचा एक भाग म्हणून आज हे करण्यात आले. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असल्याचे नियोजन संघर्ष समितीने केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी उद्भवलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसतो, असा आरोप पाटील यांनी केला. ओबीसींच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत या आधी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करून त्या समजून घेतल्या आहेत. यात ठरल्याप्रमाणे पुढील मंत्रीमंडळ बैठकीत ओबीसींचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. आजच्या या आंदोलनात ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी या मागणीसह यापुढील जनगणना जातनिहाय करण्यात यावी, ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा व भरती प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER