युवासेना मदतीला धावली; अंगावर झाड कोसळून आईचा मृत्यू, अनाथ मुलांचा खर्च उचलणार

Yuvasena

मुंबई :- तोक्ते चक्रीवादळामुळे (Touktae Cyclone) मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. घरांची पडझड झाली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तर या वादळामुळे अनाथ होण्याची वेळ मुंबईतील वरळीत राहणाऱ्या दोन मुलांवर आली. वादळामुळे झाड कोसळून अंगावर पडल्याने संगीता खरात यांचा मृत्यू झाला. लोकांच्या घरातील धुणीभांडी करुन मुलांना शिक्षण देणाऱ्या संगीता खरात यांच्यामृत्यूनंतर अनेक संस्था पुढे आल्या आहेत. अनेकांनी खरात कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे. आता युवासेना (Yuvasena) या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचणार आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. युवासेनेने मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलल्याने खरात कुटुंबियांचा अर्धा भार हलका झाला आहे.

आधीच गरिबी. त्यात कधी घरकाम तर कधी भाजी विकून संगीता खरात आपलं घर चालवत होत्या. २० वर्षापूर्वीच नवऱ्याने सोडल्याने संगीता खरात यांनी संपूर्ण घराचा गाडा चालवला. पण चक्रीवादळानं होत्याच नव्हतं केलं. घरकाम करुन घरी येत असताना संगीत खरात यांच्या अंगावर झाड कोसळलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. खरात यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आहेत. अभिषेक आणि अनिकेत अशी त्यांची नावं. ही मुलं आधीच बापाविना पोरकी होती त्यात आईचं छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. लोकांच्या घरची धुणीभांडी करुन संगीता मुलांच्या शिक्षणासह घरखर्च उचलत होत्या. पण त्यांच्या मृत्यूमुळे आता काय? या मुलांच्या भविष्याचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला. आईची शिक्षण द्यायची ताकद नसल्याने मोठा मुलगा अनिकेतला शिक्षण सोडून मजुरी करावी लागली पण आपल्या नशिबी असलेले भोग आपल्या लहान भावाला मिळू नये याची चिंता त्याला सतावत होती. परंतु आता युवासेना शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याने खरात कुटुंबियांचा भार काहीसा हलका होण्यास मदत मिळणार आहे.

ही बातमी पण वाचा : मोदी गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे का वागतात, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button