क्रिकेटपटू संदीप शर्माने ‘डिलीट’ केलेले व्टिट चर्चेत, मनोज तिवारीचेही व्टिट व्हायरल

Sandeep Sharma's tweet trending even after deletion

सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) व इतर क्रिकेटपटूंच्या शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) व पाॕपस्टार रिहान्नाच्या (Rihanna) प्रत्युत्तरात केलेल्या व्टिटनंतर सुरू झालेल्या व्टिट युध्दात बहुतेक सेलिब्रेटी हे आपल्या अंतर्गत मामल्यांत इतरांनी नाक खूपसू नये या मताचे असले तरी दोन क्रिकेटपटूंनी मात्र याबाबत वेगळे मत मांडले आहे. सनरायजर्स हैदराबादचा पंजाबी जलद गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी आपली ‘मन की बात’ मांडली आहे पण संदीप शर्माने काही वेळातच आपले व्टिट डिलीट केले आहे. संदीप शर्माने व्टिट का डिलीट केले हे समजू शकलेले नाही पण मनोज तिवारीलाही व्टीट डिलीट करावे लागू शकते असा इशारा काही जणांनी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने रिहान्नाच्या व्टिटला आक्षेप घेत शेतकऱ्यांचे आंदोलन हा भारताचा अंतर्गत मामला असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. त्याच्या उत्तरात संदीप शर्माने म्हटले होते की तसा विचार केला तर कुणीच कुणाबद्दल विचार करु शकणार नाही कारण प्रत्येकच गोष्ट किंवा स्थिती ही कुणाचा न कुणाचा अंतर्गत मामला असते.

27 वर्षीय संदीप शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये 92 सामन्यांत 109 विकेटस् आहेत. त्याने विराट कोहलीसारख्या आघाडीच्या फलंदाजाला 7 वेळा बाद केले आहे.

संदीप शर्माने आपल्या व्टिटमध्ये म्हटलेय की, असाच विचार केला तर नाझींनी जर्मनीत ज्यू लोकांवर केलेले अत्याचार हासुध्दा त्यांचा अंतर्गत मामला होता. तसाच विचार केला तर पाकिस्तानात अहमदी समुदाय, हिंदू, शिख व ख्रिश्चनांच्या होणाऱ्या छळाबद्दल बाहेरच्या कुणीच बोलू नये. तसाच विचार केला तर भारतात मुस्लीमांवरील अत्याचार आणि 1984 मधील शिखांच्या हत्याकांडाबाबतही बाहेरच्या कुणी बोलू नये. तसा विचार केला तर अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारांबाबतही बाहेरच्या कुणालाही बोलता येणार नाही. तसा विचार केला तर चीनमध्ये झालेल्या युघार मुस्लीमांच्या छळाबद्दल कुणालाच बोलता येणार नाही. तसाच विचार केला असता,तर दक्षिण आफ्रिकेतील रंगभेदाचा बाहेरच्या दुनियेला धिक्कार करताच आला नसता. म्यानमारमधील रोहिंग्यांच्या छळाबद्दल बोलताच आले नसते. शेवटी हे सर्व तर म्हटले तर त्या त्या देशांचे अंतर्गत मामले होते.

सचिनच्या व्टिटप्रमाणेच संदीप शर्माचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आणि त्याने ते डिलीट केले असले तरी अजुनही ते ट्रेंडिंग आहे.

बंगालचा फलंदाज क्रिकेटपटू मनोज तिवारी यानेसुध्दा या विषयावर एक मार्मिक रेखाचित्र ट्विट केले आहे. त्या चित्रासोबत त्याने म्हटलेय की, मी लहान असताना कधीच बाहुल्यांचा (कठपुतली) खेळ पाहिला नव्हता. मला तो बघण्यासाठी 35 वर्षे जावी लागली.

दुसरीकडे सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर, अनिल कुंबळे, रवी शास्री या क्रिकेटपटूंसह फिल्मस्टार अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर यांनी ‘एकजुट भारताची हाक दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER