संदीप जोशी यांचा मनपा निवडणूक संन्यास

Sandeep Joshi

नागपूर : यापुढे महानगरपालिकेची निवणूक लढणार नाही, अशी माहिती महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.

याबाबतची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, मी महापालिकेतील सर्वोच्च पद भूषवल्यानंतर पुन्हा मनपाची निवडणूक लढणे योग्य वाटत नाही. आम्हीच निवडणूक लढत राहिलो तर इतर कार्यकर्त्यांनी काय करावे? इतरांनाही संधी मिळाली पाहिजे.

आता आमदाराची निवडणूक लढणार का, या प्रश्नाच्या उत्तरात जोशी म्हणालेत की ज्यावेळी याबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी बघू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER