स्मार्ट सिटीत मुंढेनी घोटाळा केला यावर संदीप जोशी ठाम; न्यायालयात तक्रार दाखल

Tukaram Mundhe- Sandeep Joshi

नागपूर :- तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला यावर महापौर संदीप जोशी ठाम असून त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. महापौर संदीप जोशी यांचा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

मुंढेंसह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असा आरोप जोशी यांनी केला असून त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

ही बातमी पण वाचा : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना उच्च न्यायालयाची नोटीस !

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकवरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना 9 जुलै रोजी नोटीस बजावण्यात आली आहे.

15 दिवसांत त्यांना यावर उत्तर द्यायचं आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील श्रीरंग भांडारकर यांनी दिली आहे.
एवढेच नाही तर, तुकाराम मुंढे यांना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस पाठवली आहे. महापालिकामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचं एका महिला अधिकारीनं महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर महापालिकेत आयुक्त विरुद्ध महापौर हा सामान चांगलाच रंगला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER