उद्धव ठाकरेंच्या ‘विज्ञान’, ‘कला’च्या अगम्य भाषणाची झडती घेणारे मनसेचे बोचरे ट्विट

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करणं हे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं हे एक आर्ट आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते . यावरून ठाकरेंच्या ‘विज्ञान’, ‘कला’च्या अगम्य भाषणाची झडती घेणारे मनसेने बोचरे ट्विट केले आहे.

ही बातमी पण वाचा:- बेरोजगार मराठी युवकांच्या रोजगारासाठी मनसेचा नवा उपक्रम सुरु

नळातून पाणी येतं, पाणी येतं नळातून, किंबहुना नळातूनच पाणी येतं, नक्कीच पाणी येतं, नळातून पाणी येणं हे सायन्स आहे; पण ते बादलीत भरणं हे आर्ट आहे, आणि मी नळातून बादलीत पाणी भरल्याशिवाय राहणार नाही बाकी सरकारला धोका नाही- असे ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .दरम्यान उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत म्हणाले होते की, लॉकडाऊन करणं हे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं हे एक आर्ट आहे. पावसाळा येतो आहे. पाऊस पडला की शेवाळ साठते. त्या शेवाळावरून आपला पाय घसरू नये म्हणून काळजी घेतो. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. गेल्या आठवड्यात मी संपूर्ण यंत्रणेची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. कोरोनासोबत जगायला शिका हे आपण सगळ्यांकडून ऐकतो आहोत. ते जगायचं म्हणजे काय? तर मास्क लावणं हे अपरिहार्य आहे. तसेच शिस्त ही प्रत्येकाने पाळायचीच आहे. बाहेर जाऊन आल्यानंतर हँडवॉशने हात धुणं, सॅनेटायझर वापरणं या सगळ्या गोष्टी वापरा. शक्यतो ६५ वर्षे वयाच्या वरील असलेल्या लोकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन मी तुम्हाला करतो आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते . यावरून मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंवर ताशेरे ओढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER