‘त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म’; शिवसेनेच्या सादेला मनसेची सणसणीत चपराक

Sanjay Raut-Raj Thackeray

मुंबई :‘राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ (Thackeray) ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांना साद घातली आहे.

मात्र त्यांच्या या सादेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, पण ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे.

तर महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म…तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.त्यांच्या कठीण समयी शिवसेनेला साथ देण्याची गरज भासली नाही. आणि आता साद देत आहेत. कठीण समयी राज ठाकरेंना साथ न देणाऱ्यांनी आता आपुलकी दाखवू नये, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पक्षाची भूमिका राज ठाकरे हेच याबाबत स्पष्टीकरण देतील, असेही देशपांडे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : व्यंगचित्रांचे फटकारे मारणाऱ्यांच्या समर्थकांनी ही मारहाण करावी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER