लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही : मनसे नेत्याची टीका

मुंबई : कोरोनाचा (Corona)प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली मुंबई लोकल सर्वसामन्यांसाठी लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होते . या आंदोलनादरम्यान मनसेच्या नेत्यांनी नियमांचे उल्लंघन करत प्रवास केला . या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), मनसे नेते संतोष धुरी (Santosh Dhuri), गजानन काळे ?(Gajanan Kale), अतुल भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली .

“आम्हाला अजून अटक झालेली नाही. आम्ही स्वत: पोलिसांना शरण जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक होते ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, अन्यथा दंड देऊन सोडलं जातं. सरकारचा किती आकस आहे, हे यातून दिसून येतं, असे संदीप देशपांडे म्हणाले “आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. ते फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी होतं. त्यावर सरकार चर्चा करायला तयार नाही. आमच्यावर तुमचा राग आहे तर मग रेल्वे प्रवासी संघटनांसोबत चर्चा करा. पण आंदोलन करु नये म्हणून ही सर्व हुकुमशाही सुरु आहे, असेही देशपांडे म्हणाले .

ही बातमी पण वाचा : मनसे नेते संदीप देशपांडेंसह तीन नेत्यांवर गुन्हा दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER