सविनय कायदेभंग : मनसेचे संदीप देशपांडे यांना जामीन

Sandeep Deshpande

कल्याण : जनतेकरिता लोकल रेल्वे सुरू करा, या मागणीसाठी मनसेने काल ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन केले. आंदोलन करू नका, यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. या नोटीसचे उल्लंघन करत मनसेने नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी इतर तीन कार्यकर्त्यांसह कर्जत ते शेलू रेल्वेने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

या प्रकरणी कर्जतहून देशपांडेंसह अन्य तीन कार्यकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. आज कल्याणच्या रेल्वे न्यायालयात त्यांना हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर देशपांडे यांच्या वकिलानाने जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने १५ हजारांच्या जामिनावर देशपांडे यांना सोडले.

यावेळी न्यायालयाच्या आवारात मनसे (MNS) कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली व त्यामुळे देशपांडे यांच्या वकिलांना न्यायालयात येण्यास उशीर झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER