संदीप देशपांडे-संतोष धुरींच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात

Sandeep Deshpande - Raj Thackeray - Santosh Dhuri

मुंबई : सर्व सामान्य जनतेसाठी लोकल सेवा बहाल करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी मुंबई लोकलमधील सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. त्यानंतर बुधवारी या दोघांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) सर्वसामन्यांसाठी लवकर सुरू करा, या मागणीसाठी मनसेकडून (MNS) दोन दिवसांपूर्वी लोकल प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विनातिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम १४७,१५३,१५६अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडेंसह काही मनसे नेत्यांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या सर्व घडामोडींनंतर संदीप देशपांडे यांनी आज राज ठाकरेंची ‘कृष्णकुंज’ येथे भेट घेतली. या दरम्यान, राज ठाकरे यांनी दोघांच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसाठी पोज दिली. त्यामुळे या दोघांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन होते, असे म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER