‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे

Sandeep Deshpande-Anil Parab.jpg

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारपासून राज्यभरात एसटी पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. यावरुन मनसेने परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारणा केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अनिल परब हे १०० टक्के एसटी सेवा सुरु करण्याच्या विचारात आहेत. मात्र ते एसटीच्या सगळ्या प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोकांनी सहा महिने कोमट पाणी प्यायले. मात्र त्यांना कोरोना झाला, ती जबाबदारी कुणाची होती? लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेनी जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे, हे लक्षात असू द्या, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार एसटी बस सेवा पुर्ण क्षमतेने सुरू करण्यास सुरूवात झाली. प्रवाश्याना मास्क, सॅनिटाइझ करणे बंधनकारक केलं. सुरक्षा घेऊनच एसटी प्रवास सुरु केला आहे. एसटी आधीच तोट्यात होती. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आणखी तोट्यात गेली. त्यामुळे आता एसटी सुरु केली, असं मत अनिल परब यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER