राज ठाकरे यांच्यामुळेच राऊत ‘सामना’त; अन्यथा कारकुनी करताना दिसले असते – मनसे

Sanjay Raut-Raj Thackeray-Sandeep Deshpande

मुंबई : बुधवारी पुण्यात लोकमत वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या समर्थकांनी आपली गाडी जाळली होती असं वक्तव्य केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे संदीप देशपांडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊतांवर टीका केली आहे.

“संजय राऊत हे एक नंबरचे फोकनाड असून राज ठाकरेंनी त्यांना ‘सामना’मध्ये आणले. राज ठाकरेंनी त्यांना ‘सामना’मध्ये आणले नसते तर आज राऊत कुठेतरी कारकुनी करताना दिसून आले असते. ” असा टोला देशपांडे यांनी राऊतांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना लगावला आहे. “संजय राऊत यांना आता तिन्ही पक्षांचे सरकार आल्यानंतर काही काम उरलेले नाही.

‘आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते’, मकर संक्रांतीनिमित्त मनसेचा नारा

त्यामुळे काहीतरी वक्तव्ये करून प्रसारमाध्यमांमध्ये झळकत राहायचं म्हणून ते असं विधान करत आहेत. ” असंही देशपांडे यावेळी म्हणाले. राऊत यांनी मनसैनिकांनी गाडी फोडण्याची आठवण करून दिल्यानंतर देशपांडे यांनी यावरूनही राऊतांना सुनावले आहे. “ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे. या घटनेनंतर राज ठाकरेंनी त्यांना नवी कोरी गाडी दिली होती. ” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला.