बाळासाहेबांचे स्मारक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? संदीप देशपांडे

Sandeep Deshpande - Balasaheb Thackeray

मुंबई :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज ८वा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकासाठी फक्त जागा घेतली आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी स्मारक का उभारलेले नाही?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. स्मारक की मातोश्री तीन?? असा खोचक सवालही संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी महापौर बंगला हस्तांतरित करण्यात आला. मात्र अद्यापही तो बंदिस्त आहे. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? फक्त २३ जानेवारी आणि १७ नोव्हेंबर आलं की टेंडर काढलं आहे, त्याचं काम सुरु आहे हेच सांगितलं जातं. पुढे त्याचं काय झालं काहीही समजत नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

जर खरोखर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे? ते सर्वसामान्यांसाठी खुलं का नाही? जनता तिथे का जाऊ शकत नाही? कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं ते का वापरलं जातं? असे प्रश्नही संदीप देशपांडेंनी उपस्थित केले आहेत.

ही बातमी पण वाचा : मंत्रालयावर भगवा फडकणे हे बाळासाहेबांचे यश : शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER