वाघ आहे का बेडूक?, शिवसेनेवर मनसेची बोचरी टीका

Sandeep-Deshpande-Uddhav-Thackerey

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तेत आलेल्या शिवसेनेने सीएएला आता आपला पाठींबा दर्शवला आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.

सीएए, एनपीआरला पाठिंबा देऊ नका; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धवला सल्ला

या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी, सीएएला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. हा कायदा कुणालाही देशातून काढण्यासाठीचा कायदा नाही. एनआरसीबाबत जे वातावरण तयार केलं जातं आहे, की मुस्लिमांनाच त्रास होणार, ते चुकीचं आहे असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक? असे देशपांडे यांनी म्हटले आहे.