‘मुंबई महापालिकेला लुटणाऱ्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल’ : संदीप देशपांडे

Sandeep Deshpande & Uddhav Thackeray

मुंबई : विरप्पनने जेवढं लुटलं नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेला लुटलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेव (Shivsena)र केला आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा सेनेवर निशाण साधला. मुंबई महापालिकेला लुटण्यासाठी विरप्पन गँग काम करत आहे. ही विरप्पन गँग महापालिकेला मोठ्याप्रमाणात लूटत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं म्हणत देशपांडे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.

रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन. पालिकेतील सत्ताधारी हे त्यांच्याच लोकांना काम देत असून यात मोठी लूट आहे. या लूटीविरोधात मनसे आता सर्व पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. आज पुन्हा एकदा पक्षाची बैठक असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

कोरोनाच्या काळात सर्वसामान्य लोक त्यांच्या समस्या घेऊन लोक राज ठाकरे यांच्याकडे आले. राज ठाकरेंनीही जातीने लक्ष घालून त्या समस्या सोडवल्या. आता लोकांची लूट थांबवण्यासाठी मनसे पक्ष जोमाने उतरणार असून राज ठाकरे आम्हाला मार्गदर्शन करणार, असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER