संदीप बाजड, बाळासाहेब देशमुख यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार जाहीर

अमरावती : कला, पर्यटन, सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य मानवसेवा परिषदेचे २०१८ या वर्षासाठीचे पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिलजी बोंडे यांचे स्वीय सहाय्यक तसेच महाव्हाईस न्यूज चँनेलचे विशेष प्रतिनिधी व द. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे संस्थापक सदस्य संदीप बाजड आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख या दोन वैदर्भीय पत्रकार साहित्यिकांनी यंदाच्या स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय प्रतिभा पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

शनिवार २८ जुलै २०१८ रोजी गोवा विधानसभेचे सभापती मा.डॉ. प्रमोदजी सावंत, गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री मा.दिगंबर वसंत कामत, समाजरत्न मा.गंगाधर बी.व्हसकोटी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रवींद्र भवन नाट्यगृह वास्को-गोवा येथे आयोजित ५ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाच्या व्यासपीठावरून पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

गोवा – महाराष्ट्र अंतर्गत शासन मान्यता प्राप्त मानवसेवा विकास फाउंडेशन व कला पर्यटन सांस्कृतिक महोत्सव समिती, मानवसेवा साहित्य अकादमी महाराष्ट्र, कला सप्तसूर संस्था गोवा आणि जीवन ज्योती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २८ जुलै २०१८ रोजी हा सोहळा सकाळी १० वाजता रवींद्र भवन नाट्यगृह वास्को, गोवा येथे आयोजित करण्यात आला आहे. ५ वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलनातील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय व राज्य स्तरीय पातळीवरील पुरस्कार विजेत्यांमध्ये गोमंतकीय सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व पत्रकारितेसह इतर सर्वच क्षेत्रात विशेष कार्य गौरवार्थ संदीप बाजड (अमरावती) व बाळासाहेब देशमुख (वाशिम) यांना हा विशेष मानाचा भव्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. देशातील विविध भाषांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरस्कार समितीने या पुरस्कारांसाठी नावांची शिफारस केली होती. आज साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर अ.पाटील, कला-पर्यटन-सांस्कृतिक महासमितीचे अध्यक्ष प्रा.बी.एन.खरात, सप्तसूर कला संस्था गोव्याचे अध्यक्ष विजय उर्फ राजेंद्र केरकर आणि गोवा राज्याचे स्थानिक जनसंपर्क अधिकारी कमांडर वसंतराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

५ वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाचे उद्घाटन गोवा विधानसभेचे सभापती मा.डॉ. प्रमोदजी सावंत, गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री मा.दिंगबर वसंत कामत यांच्या हस्ते होणार आहे, तर संमेलनाध्यक्ष पदी मा.गंगाधर व्हसकोटी चँरीटेबल ट्रस्ट गडहिंग्लजचे संस्थापक समाजरत्न मा. गंगाधर बी.व्हसकोटी उपस्थितीत राहतील. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून गो.म.सा.अकादमीचे गोवा अध्यक्ष मा. अनिल सावंत, कारगिल हिरो महावीरचक्र मा. दिघेन्द्र कुमार, द. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. किशोर आबिटकर, पुणे बालाजी बिल्डकॉनचे संचालक मा.सुनील तोटे, चित्रपट कलावंत मा. पदमजा खटावकर, राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. मेजर व्ही.आर,जाधव, ठाणे येथील समाजसेविका व उद्योजिका सौ.संगिता घाग, उत्कर्ष फाउंडेशन गुजरातचे अध्यक्ष मा.डॉ.निलेश अस्वार, महाराष्ट्रातील समाजसेवक मा.विजयकुमार गडलिंगे, मानवसेवा विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर अ.पाटील, कला-पर्यटन-सांस्कृतिक महासमितीचे अध्यक्ष प्रा.बी.एन.खरात, सप्तसूर कला संस्था गोवा अध्यक्ष विजय उर्फ राजेंद्र केरकर आणि गोवा राज्याचे स्थानिक जनसंपर्क अधिकारी कमांडट वसंतराव महाडिक यांच्यासह गोवा व महाराष्ट्र राज्यातील गोमंतकीय सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व पत्रकारितेसह इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.