सॅंडलवूड ड्रग स्कँडल : विवेक ओबेरॉयच्या पत्नीच्या भावाचाही संबंध

Vivek Oberoi - Aditya Alva

मुंबई : सँडलवूड ड्रग स्कँडलमध्ये (Sandalwood Drug Scandal) बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याच्या पत्नीचा भाऊ आदित्य अल्वा (Aditya Alva) याचे नाव आले आहे. अलीकडेच बंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रँच (Bengaluru Central Crime Branch) टीमने (सीसीबी) बंदी आसलेल्या अमलीपदार्थांच्या वापराबाबत कन्नड सिनेअभिनेत्री रागिणी द्विवेदीसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या १२ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला त्यात आदित्य अल्वा याचे नाव आहे.

आदित्य कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा (Jeevaraj Alva) यांचा मुलगा आहे. अमलीपदार्थांच्या सेवन प्रकरणात बंगळुरूमध्ये सेलिब्रिटी अमलीपदार्थांचं सेवन करत असल्याच्या वृत्तानंतर सुमारे १० दिवसांनी ही अटक करण्यात आली. आदित्य अल्वा हा हाय- प्रोफाईल पार्टीमधला लोकप्रिय चेहरा आहे. आदित्यला अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्याच्या अटकेसंदर्भात कोणतीही अधिकृत नोटीस जारी करण्यात आली नाही.

शहर सहआयुक्त संदीप पाटील (Sandeep Patil) म्हणाले की, आम्ही रागिणी व इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यात ड्रग पेडलर्स शिवप्रकाश रविशंकर, राहुल शेट्टी आणि पार्टी प्लॅन वीरन खन्ना यांचा समावेश आहे. रागिणी आणि शेट्टी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER