‘सॅण्डलवूड ड्रग्ज’ : विवेकची पत्नी चॊकशीसाठी हजर झाली नाही

Vivek Oberoi

बेंगळुरू : ‘सॅण्डलवूड ड्रग्ज’च्या चौकशीत अभिनेता विवेक ओबेराय याची पत्नी प्रियंका सेंट्रल क्राईम ब्रँचसमोर हजर झाली नाही. या प्रकरणात प्रियंकाचा भाऊ आदित्य हा एक आरोपी आहे व तो एक महिन्यापासून फरार आहे. त्याची माहिती मिळवण्यासाठी प्रियंकाला शुक्रवारी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

सेंट्रल क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्रियंकाने समन्सचे पालन करणे तर दूर, त्याची दखलसुद्धा घेतली नाही. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बंगळुरूच्या पोलिसांनी विवेकच्या मुंबई येथील घरावर धाड टाकली होती. त्यावेळीही प्रियंकाने माहिती देण्याबाबत पोलिसांना सहकार्य केले नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER