संजय राऊत म्हणाले, ‘दया, कुछ तो गडबड जरूर हैं’, तर चित्रा वाघ म्हणाल्या, ‘सही पकडे हैं’

Chitra Wagh - Sanjay Raut - maharastra Today

मुंबई : आज सकाळपासून सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होत असलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून आता नेत्यांमध्ये ट्विटरवॉर रंगायला सुरुवात झाली आहे. सीबीआयच्या धाडी आणि अनिल देशमुखांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत ‘दया, कुछ तो गडबड जरूर हैं, असं म्हटलं होतं. त्यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनीही भाभीजीच्या स्टाईलमध्ये सही पकडे हैं… म्हणत राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांच्या घरावर सीबीआयनं धाडी टाकल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्या घरासह १० ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी ट्विट करत, सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्न यांचा प्रचंड गाजलेला, ‘दया, कुछ तो गडबड हैं’  असा डायलॉग वापरला. सीबीआयच्या कारवाईवर संशय घेणारं असं त्यांचं ट्विट होतं.

यानंतर काही वेळातच चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तपासात गडबड आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टानंच दिल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनाही टीव्ही मालिकेत गाजलेल्या भाभीजीचा, सही पकडे हैं… हा डायलॉग म्हणत प्रत्युत्तर दिलं. चित्रा वाघ यांनी यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडीवर राऊतांच्या ट्विटला धरूनही टीका केली. गडबड केली म्हणूनच #CBI आली.  बडबड न करता न्यायालयाचा आदेश व्यवस्थित वाचावा जेणेकरून न्यायव्यवस्थेच्या  तर्कसंगतेचा आपणास बोध होईल, असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे फोटो पोस्ट केले. तसंच जर कुणी काही केलंच नसेल तर नेमकी एवढी भीती आहे तरी कशाची, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button