सना खान ने केले मौलाना मुक्ती अनस सोबत लग्न

Sana Khan

सुंदर दिसणाऱ्या सना खानने (Sana Khan) सलमान खान सोबत ‘जय हो’ चित्रपटात काम करून बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. सनाने बिग बॉस मध्येही काम केले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी सनाने बॉलीवूडचे ग्लॅमरस, रंगीन जग सोडून धार्मिक बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने आपल्या पेहरावातही बदल करून स्वतःला संपूर्ण बदलून टाकले होते. याच सनाने आता एका मौलवीबरोबर लग्न करून संसार थाटला आहे. शुक्रवारी एका अत्यंत साध्या घरगुती समारंभात सनाने लग्न केले.

स्वतः सनानेच पती मौलाना मुक्ती अनस (Maulana Mukti Anas) सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या कपड्यातील सनाने हातावर मेंदी काढली असून भरपूर दागिनेही घातलेले फोटोत दिसत आहेत. सना या रूपात खूपच सुंदर दिसत असून तिच्या पतीने सफेद कुर्ता पायजमा घातलेला दिसत आहे. या फोटो सोबत सनाने लिहिले आहे, एकमेकांशी प्रेम केले अल्लासाठी आणि एक मेकांबरोबर लग्न केले अल्लासाठी. या जगात अल्ला आम्हा दोघांना एकत्र ठेवो आणि जन्नत मध्येही आम्हा दोघांना पुन्हा एकत्र घेऊन येवो.

बॉलिवूड सोडताना सना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक भली मोठी पोस्ट लिहून फॅन्स चे आभार मानत बॉलिवूड सोडण्याचे कारणही सांगितले होते. सना खानने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले होते, “बंधू आणि भगिनींनो, आज मी माझ्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या वळणावर आले असून त्याबाबतच तुमच्याशी बोलत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या शोबिज फिल्म इंडस्ट्रीत काम करीत आहे. या काळात मला आदर, सन्मान आणि पैसा भरपूर मिळाला. तसेच माझ्या प्रशंसकांचे भरपूर प्रेमही मिळाले. यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात वेगळे विचार येत होते. माणूस पृथ्वीवर येतो तो फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठीच येतो का? असा प्रश्न वारंवार माझ्या मनात उद्भवत होता. आपले जीवन गरीब आणि असहाय्य लोकांच्या मदतीसाठी अर्पण करावे असा विचार कोणी का करत नाही, तसेच एखादी व्यक्ती आपला कधीही मृत्यू होऊ शकेल असा विचारही का करू शकत नाही? मेल्यानंतर त्या व्यक्तीचे काय होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे मी शोधत होते. विशेष करून, मेल्यानंतर माझे काय होईल? हा प्रश्न मला सारखा सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी मी बॉलिवुड सोडून धर्माचा आधार घेत आहे.

या पोस्टनंतर सना खानने बॉलिवूडला राम राम केला आणि ती धर्म कार्याला लागली. आपले हे काम पुढे नेण्यासाठी तिने आता एका मौलवी बरोबर लग्न केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER