संवेदनशील त्वचेसाठी मेकअप

makeup

मेकअप हे सर्वाच स्त्रीयांसाठी खूप महत्वाचा भाग झालाय. मेकअप शिवाय कुठेही जाणे हे त्यांच्यासाठी अशक्य. पण त्वचा संवेदनशील असेल तर मेकअप करणे अवघड होऊ शकते. म्हणूनच अश्या वेळेस काही गोष्टी लक्ष्यात ठेवल्यास संवेदनशील त्वचेवर सुद्धा तुम्ही मेकअप करू शकता. त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतंही मेक अप प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याचं त्वचेवर परीक्षण करणं गरजेचं ठरतं.

  • अॅलर्जिक त्वचा असणार्‍या व्यक्तींनी मेक अपची सुरुवात क्लिंजिंग आणि मॉईश्चरायझिंगने करावी. त्यानंतर फाउंडेशनचा अत्यंत पातळ थर लावून घ्यावा.
  • नंतर चीकबोन्सच्या थोडं खाली, नाकाच्या दोन्ही बाजूला आणि कपाळाच्या बाजूंना ब्रोंजर लावा. नाकाला अधिक उठाव येण्यासाठी काँट्युर मेक अप करा.
  • अॅलर्जिक त्वचा असणार्‍यांनी डोळ्यासाठी मेकअपची उत्पादनं खरेदी करताना सावधगिरी बाळगावी.
  • टिश्यू आणि मेकअप ब्रशचा वापर टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्याऐवजी सुती रुमालाचा वापर करावा.
  • अँलर्जीमध्ये डोळ्याखालच्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंडर आय क्रिम लावावं.
  • अॅलर्जिक स्कीन असणार्‍यांनी शक्यतो स्वत:चे मेक अप प्रॉडक्ट इतरांबरोबर शेअर करू नयेत. याशिवाय रात्री झोपण्याआधी मेकअपला क्लिनजिंग मिल्क ने रिमुव्ह करून चेहऱ्यावर मॉईश्चरायझिंग क्रिम लावूनच झोपावे.