
अमरावती : येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे. जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले .
उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला . महाराष्ट्राला पण समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होतोय, याची उत्सुकता आहे. जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये कामात कुठे तरी अडचण येईल, खंड पडेल, असं वाटलं होतं. पण कोरोना काळातही काम मंदावलेलं नाही.अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला