समृद्धी महामार्ग : सरकारने चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मंगळवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. समृद्धी महामार्गात मोठा घोटाळा झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सभागृहात केला.

स्टेट बँकेकडून समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. खुल्या बाजारात ७.३ टक्के दराने कर्ज उपलब्ध असताना, बँकेला ९.७४ टक्के व्याज देण्यात येत आहे. हा मोठा घोटाळा असून, सरकारने त्याची चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जमीन खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केला. अधिसूचनेपूर्वीच खरेदी कशी झाली? असा सवाल त्यांनी केला. समृद्धी महामार्गावरून आज विधानसभेत गोंधळही झाला.

डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावर आणि दिल्ली हिंसाचारावर म्हणाले…..