…आणि समीर भुजबळांच्या ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’चे स्वरूप बदलले

OBC-Morcha-Aurangabad

मुंबई : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . तर दुसरीकडे  ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमातींनी पुण्यात मोर्च्याची  हाक दिली आहे. ओबीसी आरक्षण आणि मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप केला जात आहे .

तर औरंगाबादमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात आयोजित मोर्च्याचं  स्वरूप बदललं आणि त्याचं आभार मोर्च्यात रूपांतर झालं. (Sameer Bhujbal Aurangabad OBC Morcha) औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव  मोर्च्याचे  नियोजन करण्यात आले होते. माजी खासदार समीर भुजबळ  मोर्च्यात  सहभागी झाले. महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या  मोर्च्यासाठी  अनेक ओबीसी बांधव उपस्थित राहिले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे सांगण्यात आले होते . दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं आश्वासन सभागृहात दिल्यामुळे आम्ही आजचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आभार  मोर्च्यात  बदलत आहोत, असे समीर भुजबळ यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER