भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

Sambit Patra

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांना गुडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात पात्रा यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. करोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले पात्रा हे अनेक टीव्ही चर्चांमध्ये भाजपाची बाजू मांडत असतात. याव्यतिरिक्त ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची बाजू मांडत असतात. अद्याप त्यांच्या कोरोना चाचणीबाबतचा अहवाल समजू शकलेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER