जेव्हा संभाजीराजे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सतेज पाटील यांनी घेतली जावडेकरांची भेट घेतात…

मुंबई :कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीवरुन स्थानिक वारंवार नाराजी व्यक्त करत असतात. याच पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तीन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी केंद्राकडे धाव घेतली. भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती, शिवसेना खासदार संजय मंडलिक, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली.

जावडेकर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांना केंद्राकडून सहकार्य करण्याची विनंती या भेटीत करण्यात आली. त्यावर आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही प्रकाश जावडेकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER