संभाजीनगरचा प्रस्ताव शासनाकडे ; विभागीय आयुक्तालयाकडून त्रुटी दूर

Aurangabad Zillaadhikari Office

औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यासाठी ज्या प्रमुख चार त्रुटी होत्या त्या दूर करून सविस्तर माहिती मार्च महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तालयामार्फत शासनाला सादर केली आहे. त्यामुळे या प्रस्तावावरूनच सध्या शासनस्तरावर नामांतराच्या हालचालींना वेग आला आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे ही प्रशासकीय प्रक्रिया आहे आणि विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठवल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ हा वाद पुन्हा सुरू झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबादच्या नामांतरासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जानेवारी २०२० पासूनच प्रक्रियेला सुरुवात केली होती; परंतु मार्च महिन्यात अचानक कोरोना (Corona) महामारीचे संकट पुढे आल्याने प्रक्रियेला ब्रेक देण्यात आले होते. मार्चमध्येच राज्य शासनाने ज्या चार त्रुटी काढल्या होत्या याबाबत सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER