“संभाजीनगर’ चूकून टाईप झालं”

संभाजीनगर चूकून टाईप झालं-शिवसेनेकडून स्पष्टीकरण

मुंबई :- बुधवारी राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यानंतर या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरहॅंडलवर देण्यात आली. तेव्हा मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा (Aurangabad) उल्लेख संभाजीनगर (Sambhaji Nagar) असा करण्यात आला.

काँग्रेसचे (Congress) मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असतानाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला. त्यानंतर, वाद अधिक चिघळू न देता ”कधीतरी टाईप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER