संभाजीनगर : मनसेने अब्दुल सत्तार यांचे विधान ट्विट करून शिवसेनेला पकडले कोंडीत

- मला उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे

Raj Thackeray - CM Uddhav Thackeray

मुंबई : औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा, औरंगाबादचे (Aurangabad) नामांतरण संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे. यात मनसेने, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘ मला उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे. आणि शिवसेनेचा नेता मीच आहे.’ या बातमीचे कात्रण ट्विट करून शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तपत्राचं कात्रण ट्विट केले आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांचे – मला उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे, आणि शिवसेनेचा नेता मीच आहे. हे विधान अधोरेखित करत प्रश्न केला आहे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) खरे बोलत आहेत की खोटे?

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यासाठी मनसे (MNS), भाजपा (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) आग्रही आहेत. शिवसेनेच्या नेत्याच्या अशा वक्तव्यामुळे सेनेच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण होत आहे. श्रेय केंद्र किंवा राज्य सरकार कुणीही घ्यावे पण नामकरण संभाजीनगर करावे असे बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणालेत.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीमुळे नामांतराच्या मुद्दा पुन्हा भडकला आहे. काँग्रेसने (Congress) नामांतराला विरोध दर्शवताच विरोधी पक्ष भाजपाने याबाबत शिवसेनेला भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER