संभाजीनगर मार्ग, मनसेने नाशिकमध्ये लावला फलक

MNS

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलकावर ‘संभाजीनगर’चा फलक लावला. पोलिसांनी सर्व मनसेच्या कार्यकर्तांना ताब्यात घेतले आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचे आंदोलन नाशिकमध्ये मनसेच्या काय्कर्त्यांनी सुरू केले आहे. जुन्या औरंगाबाद नाक्यावर आज दुपारी मनसेने आंदोलन केले. यावेळी औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या दिशादर्शक फलकांवर ‘छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता’ असे फलक लावले.

कोरोनाच्या साथीच्या काळात परवानगी आंदोलन केल्याच्या आरोपात पंचवटी पोलिसांनी मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फलक लावल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तोपर्यंत पोलीस फक्त पहात उभे होते.

पुण्यात बस स्थानकात मनसेचे आंदोलन

पुण्याच्या ग्रामीण भागातही मनसे आक्रमक झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजगुरूनगर इथे मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांसोबत राजगुरूनगर बस स्थानकातून औरंगाबादला निघालेल्या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजी महाराजनगर’चे फलक लावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER