संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय, प्रफुल पटेल यांनी टाळले बोलणे

Praful Patel-Rename Sambhajinagar

अहमदनगर : ‘संभाजीनगर'(Sambhajinagar)हा शिवसेनेचा विषय आहे. हा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यावरील विषय नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय‌मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी या मुद्द्यांवर बोलणे टाळले.

ते आज साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. तो शिवसेनेचा विषय आहे. शासनाचा विषय येईल, तेव्हा तिन्ही पक्षांची समन्वय समितीत चर्चा होईल. समन्वय समितीत तिन्ही पक्षांचे दोन दोन ज्येष्ठ मंत्री आहेत. तात्विक निर्णयानंतर मंत्रीमंडळापुढे विषय ठेवण्यात येतात. यावर इतक्या लवकर भाष्य करणे उचित नाही. कारण नामकरणाचा विषय अद्याप समन्वय समितीकडे गेलेला नाही. त्यावर कँबिनेटमध्ये चर्चा होईल. म्हणून घाईने भाष्य‌ करणं योग्य नाही.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, सध्या राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय चांगलाच तापलेला आहे. त्यावरुन महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे दिसते आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर कराच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER