संभाजीनगर आमच्या हृदयात ; मनसेची बॅनरबाजी केवळ निवडणुकीसाठीचा स्टंट, शिवसेनेचा पलटवार

मुंबई : औरंगाबादच्या नामकरणावरून आता शिसेनेत आणि मनसेत शाब्दिक स्टंट पाहायला मिळत आहे. ‘प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचं (Aurangabad City) नाव छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar) करा नाहीतर…, असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यावरून शिवसेनेनंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी बॅनरबाजीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब म्हणाले, औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर ‘नाहीतर’ असं लिहिलेले आहे. असे अनेक ‘नाहीतर’ आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

अनिल परब यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मनसेच्या औरंगाबाद शहरातील बॅनरबाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मनसेची बॅनरबाजी ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर आहे. ‘संभाजीनगर’ हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर म्हणतो, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER