संभाजीराजे धाकटे भाऊ, उदयनराजे म्हणालेत …

Maharashtra Today

सातारा : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात काहीही मतभेद नाहीत, असे भाजपायाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale)यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, असे उदयनराजे म्हणालेत.

आरक्षण वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आले. कोणाचे काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का? असा प्रश्न उदयनराजेंनी केला. गायकवाड समिचीच्या अहवालाचे व्यवस्थित वाचन झाले नाही, झाले असते तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असा दावाही उदयनराजे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button