‘शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात’; संभाजीराजेंचे मराठा समाजाला पत्र

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्याने महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. या मुद्यावरून भाजपचे खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करायचा आहे. पण, माझ्यासाठी सर्वांचा जीव महत्वाचा आहे. यासाठी तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन, अशी घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.

संभाजीराजे यांनी मराठा समाजाला पत्र लिहिले आहे. “मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड. लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज, असे म्हणताच ५ व ६ जूनला थाटामाटात हा सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे.

यंदा सुद्धा ‘शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात साजरा करणे’ ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल.” असे संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button