मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे शिवशाहू यात्रा काढणार

Maratha Reservation - Sambhaji Raje

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा नेतेही आरक्षणासाठी ठोस पाऊल उचलताना दिसत आहेत.

महाराष्ट्र बंदला पाठींबा नाही अशी घोषणा करणारे संभाजीराजेंनी शिवशाहू यात्रेची घोषणा केली आहे. समाजात जातीय विषमता वाढत असल्याने आपण लवकरच ‘शिवशाहू यात्रा’ काढून संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. भुदरगड तालुक्यातील पाटगाव ते आदमापूरपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने आज संघर्ष यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.

तसेच, ते म्हणाले, “इसीबीसी विषयावर मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेली भूमिका ही माझी एकट्याची नाही, तर सकल मराठा समाजाची आहे. दहा टक्के आरक्षण घ्यायचं होतं, तर मग मोर्चे आणि बलिदान कशासाठी दिलं”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजात जातीय विषमता वाढत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिवशाहू यात्रा काढण्याचा आपला विचार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथे सकल मराठा समाजकडून संघर्ष यात्रेच आयोजन करण्यात आलं होत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या बाईक रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं. खासदार संभाजीराजे यांनी पाटगाव इथं मैनी महाराजांच्या मठात दर्शन घेत मराठा समाजाला संबोधित केले.

यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांची एक आठवण सांगितली. “दक्षिण दिग्विजयला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटगावच्या (Chhatrapati Sambhajiraje on Maratha Reservation) मौनी महाराज मठात आशीर्वाद घेतला होता. असाच आशीर्वाद आपण आज मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी घेतलाय आणि त्यामुळे एक वेगळीच ताकद मिळाली”, असे संभाजी राजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER