मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले कोपर्डी पुन्हा चर्चेत ; संभाजीराजे उद्या भेट देणार

Sambhaji Raje

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगला पेटला आहे. आरक्षणाच्या या लढाईत खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झाले आहेत. सध्या संभाजीराजे (Sambhaji Raje) हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (१२) जून रोजी ते नगर जिल्ह्यातील कोपर्डी (Kopardi) येथे भेट देणार आहेत. कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले, मात्र, तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या नव्या आंदोलनात त्याचाही समावेश केला जावा, यासाठी कोपर्डीकरांनी प्रयत्न सुरु आहेत .

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शनिवारी दुपारी २ वाजता संभाजीराजे भेट देतील. यावेळी पीडितेचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत, अशी माहिती तात्या सुद्रिक यांनी दिली.

कोपर्डी येथील घटनेनंतर एकवटलेल्या मराठा समाजाने (Maratha Community) राज्यभर मोर्चे काढले. आता पुन्हा एकदा याच गावातून आंदोलन सुरू होत आहे, त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक संजीव भोर यांनी केले आहे.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे जुलै २०१६ मध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांचे स्वरूप पुढे बदलत जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा उद्भवला. आता पुन्हा सुरू होत असलेल्या मराठा आंदोलनात हाही मुद्दा घेण्यासंबंधी गावकरी आणि नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या दृष्टीने संभाजीराजेंच्या कोपर्डी दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आम्हीही भिकारी नाही; नितीन राऊत आक्रामक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button