एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल संभाजीराजेंनी मानले सरकारचे आभार

MPSC

मुंबई : मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी या निर्णयाबाबत सरकारचे आभार मानले आहेत.

एमपीएससीची परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणार होती. मात्र कोरोना (Corona) आणि लॉकडाऊनचे (Lockdown) संकट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला.  त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  (Uddhav Thackeray) जाहीर केले.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल संभाजीराजे यांनी मराठा समाजातर्फे सरकारचे आभार मानले आहेत. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले – मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला याबद्दल मराठा समाजाच्यावतीने सरकारचे सर्वप्रथम आभार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER