खा. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचे नेतृत्व करावे : खा. संजय पाटील

Sambhaji Raje Chhatrapati - Sanjay Patil

सांगली : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनीच मराठा समाजाचे नेतृत्व करावे अशी मागणी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी केली आहे.

खासदार संजय पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरक्षण स्थगिती दिल्याने मराठा समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना एकत्रित येऊन स्थगितीस विरोध करीत आहेत. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्न करीत आहात. याबद्दल समाज आपला आभारी आहे, असे खासदार संजय पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रिक येवून मोठा लढा दिला होता.

त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजास नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले होते. या आरक्षणामुळे मराठा समाजातील गरीब तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण करीत असलेले काम उल्लेखनीय असेच आहे. असे खा. संजय पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER