रायगडावर संभाजीराजेंची जमिनीवर झोपून विश्रांती; लोक म्हणाले, ‘सर्वसामान्यांचे राजे दिसले’

Sambhaji Raje - Maharashtra Today

रायगड : सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीराजे यांचा एक फोटो व्हायरल मोठ्या प्रमाणात झाला आहे. एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो, तेव्हा ते दृश्य बघून अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. सध्या संभाजीराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

संभाजीराजे आज सकाळी रायगडावर तेथील सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यांनी गडावरील कामकाजाची पाहणी केली. सध्या गडावरील रोप वे बंद असल्यामुळे संभाजीराजे यांनी पायऱ्या चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि रायगड सर करून संभाजीराजे थकले. त्यांनी रायगडावर असलेल्या एका झोपडीत थोडा वेळ आराम केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर झोपून विश्रांती घेतली.

संभाजीराजे यांचा रायगडावर एका झोपडीत विश्रांती करत असल्याचा क्षण त्यांचे स्वीय सहायक केदार योगेश यांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. “राजे हा फोटो लाखो लोकांच्या काळजाचा विषय झाला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये रमणारा राजा माणूस. गडकोटांच्या रक्षणाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणारे राजे महाराष्ट्राने पाहिले. उन्हाच्या काहिलीमुळे थकून रायगडाच्या झोपडीच्या आश्रयाने थोडीशी विश्रांती घेताना पाहून राज्यातील जनता सुखावली. ” असं केदार योगेश म्हणाले.


Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button