माझं तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ, संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती

Sambhaji Raje-Devendra Fadnavis

मुंबई :- मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे कालपासून विविध पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करत आहे. आजही त्यांनी दुपारी ने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भूमिका मांडणार; राजीनामा देण्याची शक्यता 

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस याना सांगितलं की, मराठा समाजातील गरिबांची वाईट परिस्थिती आहे. समाज अस्वस्थ झाला आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर याला आपणच सर्वस्वी जबाबदार राहू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं. त्यासाठी मुख्यमंत्री-विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मी हात जोडून सांगितलं, विनम्रपणे सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आता आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही तर जे काही समाजाचं होईल, त्यासाठी माझ्यासह तुम्ही-आम्ही सर्व आमदार खासदार सर्व जबाबदार असतील.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांनी पुन्हा मन जिंकलं, १०० अनाथ मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button