मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर… खासदार संभाजीराजे

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा तापला आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोविड योद्धे म्हणून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्यावर संभाजीराजे (MP Sambhanji Raje) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मला कोरोनाचा योद्धा होऊन बाहेर पडावं असा सल्ला आहे. पण मी सुरुवातीपासूनच समाजाचा योद्धा आहे. कोरोनाचा योद्धा बनून मी बाहेर पडावं असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर समाजाचे पाच प्रश्न मी मांडले आहेत. ते त्यांनी ६ जूनला मी भूमिका घेण्यापूर्वी मार्गी लावावेत, असा अल्टीमेटम खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दोघेदेखील या प्रश्नातून मार्ग काढतील असा मला विश्वास आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. समाजाला न्याय देण्याची भूमिका या सरकारने घ्यावी. मराठा समाजाच्या प्रश्नामध्ये राजकारण आणू नये, अशी माझी प्रामाणिक भूमिका असल्याचेही यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांनी मी ६ जूनला भूमिका घेण्यापूर्वी समाजाचे ५ प्रश्न मार्गी लावावेत – खासदार संभाजीराजे छत्रपती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button