मराठा आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच ; संभाजीराजे आरक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज

Sambhaji Raje ready for the fight for Maratha Reservation

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग लवकरच कोल्हापूरमधून फुंकले जाण्याची शक्यता आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापुरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संभाजीराजे यांनी यापूर्वीच आपण 27मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कोल्हापुरातील बैठकीत नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button