खचू नका लढा आपणच जिंकू : संभाजीराजे

sambhaji chhatrapati.jpg

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे (Vivek Rahade) या विद्यार्थ्याला खा. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी श्रध्दांजली वाहिली. ‘माझ्या निडर वाघांनो तुम्हीच असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. हा लढा सुरू असताना कुणीही आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही,’ असे व्टिटच्या माध्यमातून संभाजीराजे म्हणाले. मराठा समाजाला आत्महत्येसारखे पर्याय निवडू नका, मराठा आरक्षणासाठी अटीतटीची लढाई आपण लढत असून ही लढाई आपण जिंकणारच आहोत. त्यामुळं कुणीही खचून जाऊ नका असे कळकळीचे आवाहन केले आहे. आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

बीडमधील विवेक राहाडे या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी सध्या आघाडीवर राहून लढणारे संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

‘विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रद्धांजली,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

विवेकला श्रद्धांजली वाहताना संभाजीराजे यांनी मराठा समाजातील खचून न जाण्याचं आवाहन केलं आहे. ‘आज परिस्थिती आपल्या विरोधात वाटत असली, समोर अंधार दिसत असला तरी उद्या नक्की पहाट होईल. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER