राजकारण नंतर करा, आधी आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या ! – संभाजीराजे

Sambhaji Raje

सोलापूर :- तुम्हाला जे राजकारण करायचेय ते नंतर करत बसा. पण, आधी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढा, असा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दम दिला आहे. ते म्हणाले, राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला (Maratha community) आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यायला पाहिजे. मला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही, मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे.

गेल्या सरकारच्या काळापासून मी याच गोष्टी बोलत आहे. आता मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असं संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले. आरक्षण सोडा, पण २०१४ पासून आजपर्यंत सरकारने मराठा समाजाचे बाकीचे प्रश्न तरी सोडवलेत का? महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे.

मग त्यांना मदत का केली गेली नाही? मराठा समाजातील तरुणांना घडवणाऱ्या सारथी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्यात आली.  नुसता जीआर काढून किंवा महामंडळांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही होत नाही, असा टोलाही संभाजीराजे यांनी सरकारला लगावला. ते शुक्रवारी सोलापूर (Solapur) येथे आयोजित मराठा क्रांती ठोक मोर्च्यात बोलत होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांवर टीका करताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाची कोणतीही पर्वा नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतरही संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER