विजयदुर्ग किल्ला पडझड उपाययोजना करा : खा. संभाजीराजे

Sambhaji Raje

नवी दिल्ली :- विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Pralhad Singh Patel) यांची खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje ) यांनी भेट घेतली.

यावेळी दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र दिले. बैठकीमध्ये स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी केली. पटेल यांनी तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला एस्टीमेट तयार करण्याचे आदेश दिले. पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत अशी सूचना सुद्धा त्यांनी केल्या.

आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करीत तात्काळ निर्णय घेतले. अशी प्रतिक्रिया खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER